मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ‘करोना व्हायरस’चा वाढता प्रभाव पाहता सरकारने तातडीने सर्वप्रकारची सार्वजनिक स्थळं, शाळा- कॉलेज आणि चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच ती लंडनवरून परतली होती. मात्र आता तिला लखनऊमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली होती.कनिका कपूर म्हणजे, बॉलिवूडमधील एक नामांकित नाव आहे. कनिकाने ‘बेबी डॉल मैं सोने दी’ हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे. याव्यतिरिक्त काही रिअॅलिटि शोमध्ये कनिका जज देखील होती. दरम्यान, भारत सरकार अटोनाट प्रयत्न करत असूनही देशातील रूग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 195वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 163 भारतीय असून 32 विदेशी नागरिक आहेत.