मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना जागतिक साथीपासून देशाला वाचवण्यासाठी अत्यंत निकडीच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. दि. 22 मार्चला जनता संचारबंदी म्हणजे जनता कर्फ्यू सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत पाळा. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. अशातच देशात जनता कर्फ्यूला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून याच पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनीही जनता कर्फ्यूचे समर्थन केले आहे.
दरम्यान, बिग बी शुक्रवारी ट्वीट करून याबाबत आपलं मत मांडलं. ट्विटद्वारे ते म्हणाले की, ‘मी जनता कर्फ्युचे समर्थन करतो. 22 मार्च रोजी, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत. अशा परिस्थितीत देशवासियांच्या सेवेसाठी खंबीर आणि अविरत कार्य करत राहणाऱ्या सेवाव्रतींचं कौतुक आणि अभिनंदन, असं बिग बी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी रात्री आठ वाजता देशांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले होते की,’कोरोना सारख्या अद्याप औषध न सपाडलेल्या साथीला पराभूतर करण्यासाठी संकल्प आणि संयम या दोन अक्षरी मंत्रांनी आपण या साथीला पराभूत करू शकतो. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे संकल्प करावा. गर्दीपासून लांब राहण्याचा संयम, घरातून बाहेर पडण्याचे टाळण्याचा संयम पाळून कोरोनाच्या साथीला पराभूत करू शकतो. अलीकडे ज्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतात, ते अवश्य करावे. कोरोनाच्या पराभवासाठी संकल्प आणि संयमाची गरज आहे,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.