मुंबई (वृत्तसंस्था) –कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहे. लोकही सरकारने केलेल्या आवाहनाला सहकार्य करत आहेत. याच काळात परदेशातून आलेल्या नागरिकांना 14 दिवसांचा होम क्वारंटाइनचा आदेश देण्यात आलेला असतो. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन करत आहेत.
पुण्यात परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र त्यातले काही जण अचानक पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. मात्र आता या पोलिसांनी काही पथकं तयार करुन या सगळ्यांचा शोध सुरु केला आहे. 136 पोलीस पथकांचा असणारा होम क्वारंटाइन असणारांना खडा पहारा देणार आहे. पुणे पोलीस आयुक्त के.व्यंटेशम यांनी ही माहिती दिली.
पुणे पोलिसांनी बेपत्ता झालेल्या सर्वांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. जर बेपत्ता झालेले हे लोक हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही आवाहन केलं आहे.