मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढला आहे. रविवारपर्यंत हा आकडा 74 होता. आज कोरोनाच्या 15 रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. आता कोरोनाग्रस्तांचा आकडा रोखणे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. यामध्ये मुंबईत 14 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात 1 नवीन केस समोर आली आहे. एकट्या महाराष्ट्रात आता 89 लोक कोरोनाग्रस्त आहेत. संपूर्ण देशामध्ये हा आकडा 415 वर पोहोचला आहे.