मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या वाढत्या कहरांमुळे पंजाब सरकारने राजस्थाननंतर लॉकडाऊन जाहीर केले. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार रेशन, भाजीपाला आणि औषधाची दुकाने वगळता सर्व काही बंद राहील. या आदेशात असे म्हटले आहे की शहरात बस, टॅक्सी आणि ऑटो चालविल्या जाणार नाहीत. यापूर्वी कुलूपबंदीची घोषणा करणारे राजस्थान हे पहिले राज्य होते. दरम्यान आता देशातल्या सर्वच राज्यांमध्ये लाँकडाऊन करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रसरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचेही केंद्राने निर्देश दिले आहेत. सर्वच राज्याने लाॅकडाऊन करावे आणि नियम पाळण्याचो नागरिकांना केंद्राने आवाहन केले आहे.