• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाग्रस्त आईचं दूधही बाळासाठी सुरक्षित – डॉ. टेड्रोस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2020
in भारत, विश्व
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी कोरोना पॉझिटिव्ह मातांनी बाळांना स्तनपान करणं सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

जिनिव्हामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉ. ट्रेडोस यांनी म्हटलं, की जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत संशोधन केलं आहे. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, स्तनपानातून विषाणूचा संसर्ग होण्याच्या धोक्यापेक्षाही स्तनपानातून बाळाला होणारे फायदे जास्त आहेत.

डॉ. ट्रेडोस यांनी म्हटलं, “प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना कोव्हिड-19 आजाराचा धोका कमी असल्याचं आपल्याला माहिती आहे. मात्र, इतर अनेक असे आजार आहेत ज्यांचा बालकांना अधिक धोका असतो. स्तनपानामुळे असे आजार होत नाहीत. सध्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जागतिक आरोग्य संघटना हे सांगू शकते की, कोरोना विषाणू संसर्गापेक्षा स्तनपानातून मिळणारे फायदे जास्त आहेत.”

ते पुढे म्हणाले, “ज्या मातांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे किंवा ज्यांना लागण झाली आहे, अशा मातांना स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. आईची प्रकृती गंभीर नसेल तर बाळाला आईपासून दूर ठेवू नये.”

जागतिक आरोग्य संघटनेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थविषयक सल्लागार डॉ. अंशू बॅनर्जींनी सांगितलं, “आतापर्यंत आम्हाला आईच्या दुधात म्हणजे ब्रेस्टमिल्कमध्ये सक्रीय विषाणू आढळलेला नाही. अनेक केसेसमध्ये या दुधात विषाणूच्या आरएनएचे तुकडे आढळले आहेत. मात्र, सक्रीय विषाणू सापडलेला नाही. त्यामुळे स्तनपानातून आईमुळे बाळाला कोरोनाची लागण होईल, असं सिद्ध होऊ शकलेलं नाही.”

अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) यांचं म्हणणं आहे की, नवजात बालकासाठी आईचं दूधच सर्वोत्तम आहार आहे.
आईच्या दुधातून बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, अशी कुठलीही माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. आतापर्यंत जो काही डेटा मिळाला आहे, त्यानुसार अशाप्रकारे कोरोनाचा संसर्ग होत नाही.

आई कोरोनाग्रस्त असल्यास आपल्यापासून बाळाला या आजाराची लागण होऊ नये, यासाठी आईने वारंवार हात धुवावे आणि चेहऱ्यावर मास्क लावावा, असा सल्लाही सीडीसीने दिला आहे. याच मुद्द्यावर ब्रिटनमधली NHS ही राष्ट्रीय आरोग्य सेवाही जागतिक आरोग्य संघटनेच्या मताशी सहमत आहे.

या संस्थेनुसारही आईच्या दुधातून बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे कुठलेच पुरावे अजूनतरी सापडलेले नाहीत.

मात्र, स्तनपान करताना बाळ आईच्या खूप जवळ असतं. या जवळिकीमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाग्रस्त किंवा संशयित कोरोनाग्रस्त मातांनी बाळाला ब्रेस्टफिड कसं करावं, यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं, असंही NHS ने म्हटलं आहे.

भारतातल्या भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदने (ICMR) कोरोनाग्रस्त मातांनी स्तनपान करण्याआधी हात स्वच्छ धुवावे आणि चेहरा मास्कने योग्यपद्धतीने झाकावा, असं सांगितलेलं आहे.

स्तनपानातून बाळाला कोरोना संक्रमण होत असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही, असं आयसीएमआरनेही म्हटलं आहे.


 

 

Previous Post

रत्नागिरीत आणखी 10 रूग्ण आढळले; कोरोनाबाधितांची संख्या 402 वर

Next Post

डॉक्टरांचा इशारा – ही भारतातील कोरोना संकटाची केवळ सुरुवात आहे, कठीण काळासाठी तयार रहा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉक्टरांचा इशारा - ही भारतातील कोरोना संकटाची केवळ सुरुवात आहे, कठीण काळासाठी तयार रहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon