राज्याच्या महसूल विभागाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्याच्या महसूल व वन विभागाने गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी नाशिक विभागातील नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रशासकीय कारणास्तव आदेश काढले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
किशोर शिवाजी माळी यांची एरंडोल येथून जामनेर येथे बदली करण्यात आली आहे. तर अमळनेर येथील नवनाथ कुंडलिक लांडगे यांची शिर्डी जि. अहमदनगर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. परिपत्रक आदेशावर उप सचिव संतोष गावडे यांची सही आहे.