यावल (प्रतिनिधी) – मुंबई ते नाशिक महामार्गावर कंटेनर व कालीपिली जीपच्या झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून यात यावल तालुक्यातील न्हावी येथील युवकाचा समावेश आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबई ते नाशिक दरम्यान पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनरने कालीपीलीस जोरदार धडक दिली. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील मृतांमध्ये न्हावी तालुका यावल येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रज्वल शंकर फिरके (वय – २८) या तरूणाचा समावेश आहे.
प्रज्वल शंकर फिरके हा न्हावी येथील रहिवासी असून तो सध्या मुंबई येथे राहायला होता. आज सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती येताच परिसरावर शोककळा पसरली आहे.