२४ तास अखंड कोडिंग; नवकल्पनांचा महाउत्सव
जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उद्या, १४ मे रोजी भव्य ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’ चे आयोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम १४ ते १५ मे दरम्यान २४ तास अखंड चालणार आहे. या हॅकेथॉनसाठी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी निवड प्रक्रियेनंतर १० संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले असून एकूण ३९ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १५,०००, द्वितीय १०,००० आणि तृतीय ५,००० अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील प्रमुख उपस्थिती लावणार असून या उपक्रमाचे संयोजक डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा आहेत. कार्यक्रम प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.











