मुंबई (वृत्तसनाथ) – बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन ही जोडी सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असून ही जोडी ‘क्रिश-4’मध्ये एकत्रित झळकणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण एका पार्टीत हृतिक रोशनला दीपिका पादुकोण केक खाउ घालत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. तेव्हापासून लोकांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. तसेच चाहत्यांनाही ही जोडी सिल्वर स्क्रीनवर पाहण्याची इच्छा आहे.
‘क्रिश-4′ चित्रपटाबाबत दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत सांगितले की, मी यापूर्वी असे कधीही ऐकले नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी बाब आहे. दीपिका पुढे म्हणाली की, हृतिक रोशनबरोबर तिला नक्कीच काम करायला आवडेल, असे तिने सांगितले. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दीपिका पादुकोण ’83′ चित्रपटात रणवीर सिंहसोबत झळकणार आहे. लग्नानंतर या चित्रपटात रणवीर-दीपिका प्रथमच एकत्रित काम करत आहेत. या चित्रपटाशिवाय ती ‘द इंटर्न’मध्ये ऋषि कपूर आणि शकुन बत्रा यांच्या ‘अनाम’मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत काम करत आहे.दुसरीकडे हृतिक रोशनचा ‘वॉर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमविला होता. आता हृतिकच्या चाहत्यांना ‘क्रिश-4’ची उत्सुकता लागलेली आहे.