नवी दिल्ली (वृत्तसंथा) – क्रिप्टोकरन्सीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रिप्टोकरन्सीवर लावलेले निर्बंध न्यायालयाने हटविले आहेत. . आरबीआयने बिटकॉइन तसंच इतर आभासी चलनांसंबधी नियम अत्यंत कठीण केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बिटकॉइनसारखे चलन पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये येण्याची शक्यता आहे.
सुनावाणीवेळी याचिकाकर्त्यांनी सांगितले की, केंद्रीय बँकेच्या निर्बंधामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये होणाऱ्या वैध व्यवहारांवरही मर्यादा आल्या. यावर आरबीआयकडून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ पुरवले जाण्याचा धोका असल्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. क्रिप्टोकरन्सीने व्यवहार केल्यास कुठलाच पुरावा रहात नाही. त्यामुळे सरकारी विभागाने या चलनावर बंदी घातली.