बार्शीचे नर्सिंग महाविद्यालय ठरले उपविजेते
जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन पायरेक्सीया या क्रिकेट लीग सामन्यात मुलांचा डियुपीएमसी अर्थात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. अंतीम सामन्यात ६ गडी राखून बार्शी येथील नर्सिंग महाविद्यालयाचा डियुपीएमसी संघाने पराभव केला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित प्रकाशझोतातील पायरेक्सीया या क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ, रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ४० संघ सहभागी झाले होते.
अंतीम सामना रंगला
या स्पर्धेतील अंतीम सामना डियूपीएमसी विरूध्द बार्शी नर्सिंग महाविद्यालय यांच्यात प्रकाशझोतात खेळवण्यात आला.या अंतीम सामन्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने ६ गडी राखून बार्शी नर्सिंग महाविद्यालयाचा दणदणीत पराभव केला. विजयानंतर डियुपीएमसी महाविद्यालय पायरेक्सीया चषकाचे मानकरी ठरले. तर बार्शीचा संघ हा उपविजेता ठरला.तसेच उत्कृृष्ट गोलंदाज म्हणून यश पाटील तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून चेतन पाटील यांना गौरविण्यात आले. या क्रिकेट लिगचे थेट प्रक्षेपण देखिल करण्यात आले होते. हजारो दर्शकांनी थेट प्रक्षेपणाव्दारे सामन्याचा आस्वाद घेतला.