भुसावळ ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रिडास्पर्धामध्ये यशस्वी कामगीरी केली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत फलकनाज हिने सुर्वणपदक प्राप्त केले तर जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा २०२६ मध्ये आदित्य राजेंद्र सोनवणे याने अचूक नेमबाजी, एकाग्रता आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याची आगामी विभागीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड झाली आहे. तसेच वेदांत निलेश पाटील इयत्ता सहावी याने भुसावळ तालुका सद्यशा अंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा मध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या कामगीरी बदुल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील,डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.











