जळगाव (प्रतिनिधी) – शहरात पोलीस असल्याची बतावणी करून मोबाईल लांब होणार या दोघा तोतया पोलिसांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हा शौचालयातून बाहेर आल्यावर पोलीस कटिंग केलेला अनोळखी इसम त्याला म्हणाला होता की, तुम्ही शौचालयात काय करत होते ? मी पोलीस आहे. असे म्हणत फिर्यादीचा मोबाईल मागितला होता. त्यातील सिम कार्ड काढून माझ्याकडे दे असे म्हटले होते.
त्यानुसार फिर्यादीने त्याच्याकडून मोबाईल व सिम कार्ड काढून तोतया पोलिसांना दिले होते. तोतया पोलीस मोबाईल हँडसेट घेऊन निघून गेले. होते त्यानुसार फिर्याद दाखल करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रयत्नांची शर्थ करीत तांत्रिक मदत घेत दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असून गुन्ह्यातील मोबाईल हँडसेट दहा हजार रुपये किमतीचा काढून दिला आहे.
जहीर मोहम्मद नूर मोहम्मद (वय २८, भिलपुरा चौक, जळगाव) आणि जुबेर खान वहाब खान (वय २१, रा. इस्लामपुरा) असे संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.