• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माजी मंत्री एकनाथराव खडसेच भोसरी जमीन गैरव्यवहाराचे सूत्रधार : ईडीचा दावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था ) — माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भोसरी जमीन गैरव्यवहारात हात नसल्याचा दावा केला असला तरी तेच सूत्रधार असल्याचा दावा ईडीने आरोपत्रातून केला आहे.

या आरोपपत्रात मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी शेल कंपन्यांतून फायनान्स मिळवला असतांनाच एकनाथ खडसे यांनी पत्नीच्या नावे ५० लाख ट्रान्सफर करून ३८ लाख रूपये भूखंड खरेदीसाठी वापरल्याचा संदर्भ घेण्यात आलेला आहे.

एकनाथराव खडसे यांच्यासह मंदाताई खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात अलीकडेच आरोपपत्र दाखल केले आहे. गिरीश चौधरी अटकेत असून एकनाथराव खडसे यांची ईडीने दोनदा चौकशी केली आहे. मंदाताई खडसे यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांनी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागून घेतली आहे.

एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एकनाथराव खडसे यांनी ईडीसमोरच्या चौकशीत आपल्याला या व्यवहारात काहीच माहिती नसल्याचे सांगितले असले तरी आरोपपत्रात त्यांचीच महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

आरोपपत्रात म्हटले आहे की, एकनाथराव खडसे यांनी पत्नीला ५० लाख रूपये त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. यातील ३८ लाख रूपये त्यांनी भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी करण्यासाठी उपयोगात आणले. हा भूखंड ३ कोटी ७५ लाख रूपयांना खरेदी करण्यात आला असून यावर १ कोटी ७८ लाख रूपयांचे मुद्रांक शुल्क अदा करण्यात आले आहे. अशा प्रकारे हा पूर्ण सौदा ५ कोटी ५३ लाख रूपयांचा असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. यातील २ कोटी ३८ लाख रूपये हे मंदाताई खडसे यांनी तर ३ कोटी १५ लाख रूपये हे गिरीश चौधरी यांनी भरलेत. मंदाताई खडसे यांना बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन कोटी रूपयांचे कर्ज दिले. ही कंपनी शेल कंपनी प्रकारातील असून त्यांनी अनसिक्युअर्ड लोन प्रकारातील कर्ज सौ. मंदाताई खडसे यांना दिलेत. एकनाथ खडसे यांनी दिलेल्या ५० लाख रूपयांमधून त्यांनी ३८ लाख रूपयांचा वापर या जमीन खरेदीसाठी केला.

गिरीश चौधरी यांना देखील बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चार कोटी रूपयांचे लोन दिले. यासाठी चौधरी यांनी बॅक – डेटेड प्रकारातील डॉक्युमेंट संबंधीत कंपनीला दिल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. यातीलच ३ कोटी १५ लाख रूपयांचा वापर त्यांनी भोसरी येथील भूखंडाच्या खरेदीसाठी केला. यासाठी ज्या कंपनीकडून पैसे कर्ज घेतले. ती बेचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी असल्याचे ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

ईडी समोरच्या चौकशीत एकनाथराव खडसे यांनी या व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. आपण पत्नीच्या अकाऊंटमध्ये ५० लाख रूपयांची केलेली ट्रान्सफर ही नियमित असून पतीने पत्नीच्या अकाऊंटमध्ये पैसे शेअर करण्याइतपत नॉर्मल असल्याचा दावा त्यांनी चौकशीत केला होता. तथापि, एकनाथराव खडसे यांचा यात पूर्ण सहभाग होता. त्यांनी हेतूपुर्वक पत्नी व जावयाला ही जमीन खरेदी करण्यासाठी मदत केली. यासाठी पैसे सुध्दा दिलेत. यातूनच तेव्हा २२ कोटी ६३ लाख खरे मूल्य असणारी जमीन ही ३ कोटी ७५ लाख रूपयांना विकत घेण्यात आली. नवीन भूसंपादन कायद्याच्या दरानुसार मोबदला मिळावा हा हेतू असून यासाठी एकनाथराव खडसे यांनी थेट मदत केली असून तेच याचे सूत्रधार असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रामध्ये केला आहे. तत्कालीन स्थानिक उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्यावर देखील आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांनी रेडी रेकनर दर कमी करून हा भूखंड खरेदी करून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे ईडीचे म्हणणे आहे.


 

 

Previous Post

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे स्वागत

Next Post

ट्रकची एसटी बसला धडक ; बसचा पत्रा कापल्याने 25 प्रवासी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रकची एसटी बसला धडक ; बसचा पत्रा कापल्याने 25 प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon