• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जाच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून वडिलांची आत्महत्या ; तिघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जाच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून वडिलांची आत्महत्या ; तिघांविरुद्ध गुन्हा

चोपडा शहर पोलिस ठाण्यात सावकारी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा शहराबाहेरील जुन्या माचला रोडवरील शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन ४९ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी सावकारीच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप असून, चोपडा शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०८, ११९(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच सावकारी अधिनियमातील कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव वाल्मिक जिजाबराव शिंदे (वय ४९, रा. वडळी, ता. चोपडा) असे आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता चोपडा शहराबाहेरील जुन्या माचला रोडवरील एका शेतात वडाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. याबाबत १ ऑक्टोबर रोजी दुपारी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मृताचे पुत्र रोहित वाल्मिक शिंदे (वय २०, रा. वडळी, ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वडिलांनी आरोपींकडून ८ हजार रुपये व्याजाने घेतले होते. आरोपींकडून दररोज १५० रुपये व्याजाची मागणी करण्यात येत होती. व्याजाचे पैसे देऊ न शकल्याने आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांच्या दुकानाची चावी हिसकावून घेतली. तसेच दुकानाची चावी परत मिळणार नाही, अशी धमकी देऊन त्यांच्याशी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या सततच्या सावकारी व्याजाच्या तगाद्यामुळे वाल्मिक शिंदे मानसिक त्रासाला कंटाळले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आरोपींकडून त्रास दिला जात असल्याबाबत कथित सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी शिवीगाळ व धमकी देऊन व्याजासाठी त्रास दिल्यामुळेच आपल्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप रोहित शिंदे यांनी फिर्यादीत केला आहे.

या प्रकरणी राहुल रामकृष्ण माळी (वय २८), विकास रामदास माळी (वय ३५), दोघे रा. महात्मा फुलेनगर, चोपडा आणि अनिल बारकू माळी (वय ३८, रा. तारामतीनगर, चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास सपोनि एकनाथ भिसे करीत आहेत.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

Next Post

जळगावात ६४.४४ ग्रॅम एमडीएमएसह आरोपी जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात ६४.४४ ग्रॅम एमडीएमएसह आरोपी जेरबंद

जळगावात ६४.४४ ग्रॅम एमडीएमएसह आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ६४.४४ ग्रॅम एमडीएमएसह आरोपी जेरबंद
क्राईम

जळगावात ६४.४४ ग्रॅम एमडीएमएसह आरोपी जेरबंद

October 2, 2026
कर्जाच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून वडिलांची आत्महत्या ; तिघांविरुद्ध गुन्हा
क्राईम

कर्जाच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून वडिलांची आत्महत्या ; तिघांविरुद्ध गुन्हा

October 2, 2026
गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली
जैन कंपनी

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

October 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ६४.४४ ग्रॅम एमडीएमएसह आरोपी जेरबंद

जळगावात ६४.४४ ग्रॅम एमडीएमएसह आरोपी जेरबंद

October 2, 2026
कर्जाच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून वडिलांची आत्महत्या ; तिघांविरुद्ध गुन्हा

कर्जाच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून वडिलांची आत्महत्या ; तिघांविरुद्ध गुन्हा

October 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon