• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील निराधारांना ३४५ कोटी ५६ लाखांचे वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2023
in Uncategorized
0
जिल्ह्यातील निराधारांना ३४५ कोटी ५६ लाखांचे वितरण

अर्थसहाय्य वितरणासाठी ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ मोहीमेची जोड

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्ता,  निराधार, घटस्फोटित, वयोवृध्द घटकांना दर महिन्याला देण्यात येणाऱ्या आर्थ‍िक मदतीपोटी वर्षभरात ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रूपयांची मदत करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना थेट अर्थसहाय्य वितरणासाठी ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ या मोहीमेची जोड देण्यात आल्याने मदत वाटपात पारदर्शकता व गतिमानता प्राप्त झाली आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असते.  जिल्ह्यात १ ऑगस्ट २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत एकूण ३ लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,  ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌. या योजनेत ९०१७५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १०१ कोटी ८५ लाख १६ हजार ३०० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत ६५ वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या अथवा रूपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌. या योजनेतील १९००७१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २२० कोटी ९७ लाख ६३ हजार ९८० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत दारिद्रय रेषेखालील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात. या योजनेत ८८७४६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १६ कोटी १६ लाख ८४ हजार २०० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ७९ वर्षाखालील वयोगटातील विधवा या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. या योजनेत १७३७० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३ कोटी ७९ लाख रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेत ६०३ लाभार्थ्यांना २३ लाख ६० हजार रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.  राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत ९५० लाभार्थ्याना २ कोटी ५४ लाख २० हजार रूपयांचा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ मिळत आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये देण्यात येत होते. जुलै महिन्यापासून आता दीड हजार रुपये अनुदान मिळत आहे.


 

 

Tags: #sanjay gandhi niradhar yojna newshttps://kesariraj.com/jilhyatil-niradharanna-news/
Previous Post

अत्यल्प दरात दर्जेदार रेडिओलॉजी सुविधा उपलब्ध

Next Post

महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon