• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात ११९८ बाळे जन्मली सरकारी रुग्णवाहिकेत, नऊ वर्षांत वाचले अडीच लाखांहून अधिक प्राण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2023
in Uncategorized
0
जिल्ह्यात ११९८ बाळे जन्मली सरकारी रुग्णवाहिकेत, नऊ वर्षांत वाचले अडीच लाखांहून अधिक प्राण !

मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) –  रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील  २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५१ हजार ५०३ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून १ हजार १९८ बाळांचा जन्म रूग्णवाहिकेत झाला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘१०८’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी‌. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘१०८’ रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.

कोरोना काळात देखील ‘१०८’ रूग्णवाहिकेने मोलाची भूमिका निभावली असून या रूग्णवाहिकेमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशिन, ऑक्सिजन सिलेंडर व सोबत डॉक्टर उपलब्ध राहत असल्यामुळे आरोग्य विभागावरील बराच ताण कमी झाला आहे. राज्यात २०१४ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत ९१ लाख २१ हजार ९७४ रुग्णांना १०८ रूग्णवाहिकेमुळे जीवदान मिळाले आहे.  कोरोना काळात ३५ रुग्णवाहिकांनी १५ हजार ७९३ कोविडच्या रुग्णांना सेवा दिली असून १ लाख १६ हजार ९१६ नॉन कोविड रुग्णांसाठी मार्च २०२० ते  सप्टेंबर २०२३ दरम्यान सेवा बजावली आहे. तसेच विविध आजारांच्या ६४ हजार ४५८ रुग्णांना रूग्णवाहिकेने सेवा दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात २०१४ पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त २० हजार ६२५ रूग्ण तसेच हाणामारीचे ४ हजार ४१५ रुग्णांना तर, १ हजार ४५ जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे १ हजार ५५८ रुग्ण, उंचावरून पडणे ४ हजार ५२८ रुग्ण, विषबाधा झालेले १२ हजार ६४६ रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या ३२५ रुग्णांना, ७९५ मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३३१ रूग्णांना सेवा मिळाली आहे.

वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०८’ रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते ?

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.


 

 

Tags: #jalgaon jimaka newshttps://kesariraj.com/jilhyat-1198-bale-janmli/
Previous Post

तंत्रज्ञांच्या नियमबाह्य बदल्यांविरुद्ध सोमवारपासून साखळी उपोषण

Next Post

कारागृहात होणार नवीन ४ बॅरेक, कैदी ठेवण्याची क्षमता शंभरीनें वाढणार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारागृहात होणार नवीन ४ बॅरेक, कैदी ठेवण्याची क्षमता शंभरीनें वाढणार !

कारागृहात होणार नवीन ४ बॅरेक, कैदी ठेवण्याची क्षमता शंभरीनें वाढणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon