जामनेर तालुक्यात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बु.येथील ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून जिवे मारण्यात आले. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातून सुन्न करणारी आहे. यात मृत्यूमुखी पडलेल्या बालिकेच्या परिवारास उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश डॉ केतकी पाटील यांनी आज गुरुवारी दि. २० जून रोजी भेट देऊन सांत्वन केले.
यावेळी त्यांच्या समवेत चिंचखेडा बु. गावांचे सरपंच सौ.ज्योती रमेश पारधी, माजी सरपंच धनराज पांडुरंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा धनराज पाटील, जामनेर नगर परिषदेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,बशीर शेख मोहम्मद, रवींद्र पाटील, पोलीस विभागातील अतुल पवार, समाधान पाटील,राजू चौधरी, आकाश पंडित आदी उपस्थित होते.