जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील डॉ. प्रतिभा कोकंदे यांना योगा व अँक्यूपंचर हे दोन्ही विषय एकत्रित घेऊन त्यात पीएचडी पूर्ण केली. राजस्थान येथील जगदीशप्रसाद जाबरमल टिबरेवाला विद्यापीठातर्फे (जेजेटीयू) त्याना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ प्रतिभा कोकंदे यांना पीएचडीसाठी डॉ. सुषमा मौर्य यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. डॉ. कोकंदे ह्या रामानंद नगर येथील श्री हॉस्पिटल येथे अँक्यूपंचर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे. याशिवाय जळगांव रनर्स ग्रुपच्या सदस्य आहेत. पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल प्रतिभा कोकंदे यांचे विविध क्षेत्रातून कौतुकास्पद अभिनंदन करण्यात येत आहे. डॉ. सुरेश शेलार, अभियंता राजेश पाटील, मु. जे. महाविद्यालयातील डॉ. देवानंद सोनार, डॉ. पंकज खाजबागे, लक्ष्मण कोकंदे, रणजित कोकंदे, प्रल्हाद पवार, राहुल पवार आदींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.