• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

६.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि मोबाईल हस्तगत

जामनेर (प्रतिनिधी) :- जामनेर शहरातील मदनीनगर परिसरात झालेल्या तब्बल १३ लाखांहून अधिक किमतीच्या घरफोडीचा छडा लावण्यात जामनेर पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीतील ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-03-at-18.39.29.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-03-at-18.39.30.mp4

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मसुद अक्तर मुजफर हुसेन (वय ५०, व्यवसाय-मौलवी, रा. मदनीनगर, प्लॉट क्र. ४२, जामनेर) हे दि. २५ जून रोजी रात्री कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, दि. २९ जून रोजी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील ९ लाख २३ हजार रुपये किमतीचे ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने तसेच ४ लाखांची रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ए), ३३१ (३), ३३१ (४) व ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिकांच्या माहितीवरून आरोपींचा माग काढला

घरफोडीनंतर स्थानिक नागरिकांनी रेकॉर्डवरील आरोपी शेख समिर उर्फ बाल्या शेख जाकीर (वय २४, रा. बीएसएनएल टॉवर, मदनीनगर, जामनेर) याला त्याच्या साथीदारांसह परिसरात फिरताना पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेख समिर याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद फातिर उर्फ गोलू मिया तुफेल मोहम्मद (वय २०, रा. मदनीनगर, जामनेर) याला जामनेर येथून, तर शेख अमिर शेख जाकीर (वय १९, रा. बीएसएनएल टॉवर, जामनेर) याला नाशिक येथून ताब्यात घेतले.

सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीतील ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदी, ७१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस शिपाई सचिन महाजन, ज्ञानेश्वर देशमुख आणि सुशील सत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

“गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि पोलिसांची तातडीची कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते. या प्रकरणात अल्पावधीत आरोपींना अटक करून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.”

— मुरलीधर कासार
पोलीस निरीक्षक, जामनेर पोलीस ठाणे


 

 

Tags: jamnermadhe gharphodi ulgada
Previous Post

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

Next Post

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद
1xbet russia

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon