जामनेर ( प्रतिनिधी ) – घरातील मंडळी पुणे येथे गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ७४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना जामनेर शहरातील दर्शन पार्क, वाकी रोड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी वर्षा ज्ञानेश्वर पाटील (वय ४०) या कुटुंबासह ४ जुलै रोजी पुणे येथे गेल्या होत्या. ४ जुलैच्या रात्री ९ वाजेपासून ते ६ जुलैच्या पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम व दागिने चोरून नेले.
चोरट्याने घरातून सुमारे १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीचे जोडवे, पायातील पैंजण तसेच ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. मागील दरवाजा उघडा राहिला अन् ८० हजारांचा ऐवज लंपास









