• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

कृउबा मार्केट कमिटी अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलिसांत तक्रार

जळगाव (प्रतिनिधी) : गोल्ड लोनवर तारण ठेवलेले सोने सोडवून दागिने मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव कृउबा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय अमृत महाजन यांचा मुलगा ओम संजय महाजन याच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी कृष्णा भगवान शिंदे (रा. रामचंद्र नगर, जळगाव) हे जोशीपेठेतील कालभैरव मंदिराजवळ “ओम ज्वेलर्स” नावाने सराफा व्यवसाय करतात. तक्रारीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी ओम महाजन याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ४ जून रोजी ओम महाजन याने फोन करून बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर १९ लाख रुपयांचे गोल्ड लोन असल्याचे सांगितले. ते सोडवून दागिने मोडायचे असल्याने पैसे देण्याची विनंती त्याने केली.

ओम महाजन याने तत्कालीन बँक व्यवस्थापक सुरेंद्र खंडेलवाल यांचे नाव सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिन्यांचे फोटो पाठवत व्यवहारासाठी संपर्क वाढवला. ५ जून रोजी तो शिंदे यांच्या दुकानात आला आणि तातडीने १९ लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी सोने कारागीर चेतन दुसाने यांच्या माध्यमातून शेजारील सराफा व्यावसायिक यांच्याकडून तात्पुरती १९ लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली.

६ जून रोजी शिंदे, चेतन दुसाने आणि ओम महाजन यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन १९ लाख रुपये ओम महाजनच्या खात्यात जमा केले. त्यानंतर त्याने ही रक्कम गोल्ड लोन खात्यात वर्ग केल्याचे सांगितले. मात्र तांत्रिक अडचणी, केवायसी नसणे, खाते सीझ होणे अशा विविध कारणांचा आधार घेत व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर कोटक महिंद्रा बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तरीही पैसे परत मिळाले नाहीत. दरम्यान, ओम महाजन याने वेळकाढूपणा करत सोमवारी किंवा मंगळवारी रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले.

८ जून रोजी ओम महाजन याने शिंदे यांच्या खात्यात ९९ हजार रुपये ऑनलाइन जमा केले. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याबाबत वारंवार आश्वासने देत राहिला. मात्र पुढे त्याने फोन उचलणे बंद केले. फसवणुकीची शंका आल्याने शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओम महाजनचे वडील तथा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय महाजन यांची भेट घेतली. त्यांनी मुलगा घरी नसल्याचे सांगत त्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

अखेर ओम महाजन याने ना दागिने दिले, ना संपूर्ण रक्कम परत केली. त्यामुळे आपली १८ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ओम महाजन याने सराफ बाजारातील आणखी इतर ३ ते ४ सराफा व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याचाही बाजारात चर्चा सुरु आहे, परंतु तक्रार देण्यासाठी अद्यापर्यन्त कुठल्याही सराफा व्यावसायिक तक्रार देण्यासाठी पुढे आलेला नाही. यामुळे ओम महाजन याचे अनेक कारनामे पुढे येण्याची शक्यता आहे.


 

 

Tags: shanipeth police steshan news
Previous Post

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

Next Post

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन
1xbet russia

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon