• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव हादरले ! भोंदूबाबासह  पोलीस पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांना गंडवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव हादरले ! भोंदूबाबासह  पोलीस पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांना गंडवले

साडेतीन वर्षांपासून फरार दांपत्य पोलिसांच्या हाती लागेना, फिर्यादीची एसपींकडे धाव

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींमध्ये एक भोंदू बाबा आणि त्याची पोलीस दलात कार्यरत असलेली पत्नी यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे उलटली तरी आरोपी अद्याप मोकाट असल्याने पीडितेने जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी लावली आहे.

मैत्रीचा फायदा घेत रचला जाळा
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी महिला पोलीस कर्मचारी महिमा उर्फ मनोरमा पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. पीडित महिलेच्या घरात सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत महिमा पाटील हिने आपला पती ललित पाटील याच्याकडे अलौकिक शक्ती असल्याचे भासवले. “पतीकडे उपाय असून घरातील भांडणे थांबवून सुख-शांती मिळेल,” असे आश्वासन तिने दिले.

स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि गुप्तधनाचे आमिष
भोंदू बाबा ललित पाटील याने पीडितेच्या मनात भीती निर्माण केली. “तुझ्या दिराच्या आत्म्याने घरात प्रवेश केला असून तुझ्यावर करणी करण्यात आली आहे,” असे सांगून त्याने अघोरी विधी सुरू केले. फसवणुकीचा हा सिलसिला केवळ जळगावपुरता मर्यादित राहिला नाही. आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर, उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर येथे नेऊन बनावट अघोरी पूजा केल्या. उज्जैन येथे तर थेट स्मशानभूमीत विधी करून लाखो रुपये उकळले.
बाहेरून कर्ज काढून पीडितेने सुमारे ११ ते १२ लाख रुपये रोख आणि ऑनलाईन स्वरूपात दिले. मात्र, कोणताही फरक पडत नसल्याचे पाहून जेव्हा तिने पैसे परत मागितले, तेव्हा ललित पाटील याने “मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुझ्या सात पिढ्यांचा नाश करेन,” अशी धमकी दिली.

पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह?
या प्रकरणी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिमा पाटील ही मुंबईतील भांडुप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे पोहोचले होते, मात्र ती मिळून आली नाही. साडेतीन वर्षे उलटूनही आरोपी अद्याप फरार आहेत. “आरोपी स्वतः महिला पोलीस कर्मचारी असल्यानेच तपासात दिरंगाई होत आहे,” असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.

आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळावी आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी पीडितेने आता पोलीस अधीक्षकांचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणाने जळगाव पोलीस दलात आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-16-at-15.23.00-1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-16-at-15.23.00.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-16-at-15.22.59.mp4

 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश

Next Post

उद्योजकाच्या घरातून १२ लाखांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

उद्योजकाच्या घरातून १२ लाखांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon