ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप काढले बाहेर
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेहरूनगर परिसरात राहणारी महिला मुलीला घेण्यासाठी शाळेला गेली असता ती तालुक्यातील शिरसोली येथील एका शेताच्या पाणी कमी असलेल्या विहिरीत आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कि, तिला कुणीतरी विहिरीत ढकलून दिले ? ,हि महिला शिरसोली कशी आली . याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान विहिरीत पडलेली महिलेची विचारपूस पोलिसांनी केली असता सीसीटीव्ही फुटेज अथवा ती कुठे जातांना दिसून आली नसून तिची चौकशी केली असता महिलेने माझी कुणा बद्दलही तक्रार नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आपणास भोवळ आल्याने विहिरीत पडल्याचे म्हटले आहे . महिला हि शिरसोली येथे एका रिक्षा अथवा वाहनातून गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला असून महिलेने स्वताला इजा करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यत्क्त केला जात आहे. तिच्या जबाबामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दीपिका दीपक पाटील (वय २६, रा. नेहरूनगर)असे सदर महिलेचे नाव आहे. महिला नेहरूनगर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे यांच्या घराजवळ पती,मुलांसह राहतात. सोमवारी दि. २४ जून रोजी दुपारी एक वाजेनंतर त्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या.(केसीएन) मात्र महिलेला भोवळ आल्याने ती सोमवारी रात्री विहिरीत जाऊन पडल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
दरम्यान दुसरीकडे शाळेत सदर मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी तिच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे.(केसीएन) मग तिच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले. दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा परिवार शोध घेत होते. दरम्यान शिरसोली प्र.न.येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.
त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले.(केसीएन)गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले. त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले.