• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, सुहांस जायंट्स विजयी

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 चा रोमांच शिगेला पोहचला आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत जळगाव कोगटा किंग्स आणि जामनेर सातपुडा हिरोज हा संघ विजयी झाला. त्यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने विजय मिळवला होता. उपांत्यफेरी गाठवण्यासाठी आता जेसीएलच्या सर्व संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे.

मंगळवारी दुपारी जामनेर सातपुडा हिरोज आणि अमळनेर सुहांस जायंट्स या संघामध्ये लढत झाली. जामनेर सातपुडा हिरोज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा हा निर्णय गोलदांजांनी यशस्वी ठरवला. अमळनेर संघाचा पहिला फलंदाज केवळ २ धावांवर बाद झाला. त्यानंतर ठराविक क्रमाने फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे १०२ धावांवर सात फलंदाज तंबूत परतले होते. परंतु शुभम शर्माने एक बाजू लावून धरली होती. त्याने ४७ चेंडूत धुवांधार ६० धावा केल्या. रोहित भोईने १५ चेंडूत ३२ तर यशवंत शिंदे याने १६ चेंडूत २२ धावा करत संघाची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. अमळनेर संघाचे सर्व फलंदाज १९.५ षटकांत १५२ धावांवर बाद झाले.

विजयासाठी १५३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जामनेर संघाची सुरूवात जोरदार झाली. केवळ ५.२ षटकांत एक गडी गमावत ५१ धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या प्रद्युम महाजन याने अमळनेरच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याने ४२ चेंडूत ६९ धावांची धुवांधार खेळी केली. त्यामुळे जामनेरचा विजयाचा पाया पक्का झाला. ललित पाटील १७ धावा केल्या. रवींद्र आणि क्रिषी यांनी नाबाद पार्टनशीप करत संघाला विजय मिळवून दिला. रवीद्र याने २९ चेंडूत ३१ तर क्रिषी याने केवळ १६ चेंडूत ३० धावा केल्या. जामनेरने केवळ १७.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठत ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अमळनेरच्या शुभम शर्मा आणि सतीश चतुर्वेदी यांनी एक-एक फलंदाजाला बाद केले.

जळगाव कोगटा किंगचा पुन्हा एक विजय

मंगळवारी पहिला सामना जळगाव कोगटा किंग विरुद्ध रावेर रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्याची नाणेफेक जेसीएल समिती सदस्य प्रशांत वीरकर यांच्या हस्ते झाली. या सामन्यात रावेर रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. यश नहर (9), तौसीफ मिर्झा (0) आणि संदेश (9) लवकर बाद झाल्याने संघावर दबाव आला. त्यानंतर मोहम्मद आणि आदित्यही बाद झाल्यामुळे 67 धावांत पाच गडी बाद अशी बिकट अवस्थार रावेर रॉयल्सची झाली होती. मात्र, अशपाक शेख आणि प्रज्वल राजपूत यांनी डाव सावरला. अशपाकने 36 चेंडूत 45 धावा केल्या. तर प्रज्वलने 11 चेंडूत 17 धावा केल्या. त्यामुळे रावेर रॉयलने 20 षटकांत 143 धावांपर्यंत मजल मारली. जळगाव कोकटा किंग्सकडून राज बेलदार, मनिष चव्हाण आणि सागर भावसार यांनी एक-एक गडी बाद केला.

कर्णधार जगदीश झोपे याने प्रभावी गोलंदाजी करत 15 धावा देत 2 बळी घेतले. बिपिन चावरे यांनीही 2 गडी बाद केले. 144 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जळगाव कोगटा किंग्स संघाने 15.1 षटकांत 3 गडी बाद करत 146 धावा केल्या. ओम भोसले याने 46 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. बिपिन चांगरे याने 25 चेंडूत 52 धावा करत संघाचा रनरेट वेगाने वाढवला. तोच सामनावीर ठरला.

अमळनेरचा रावेरवर दणदणीत विजय

अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स यांच्यात २० एप्रिल रोजी रात्री सामना झाला.या सामन्यात अमळनेर संघाने 20 षटकांत 7 बाद 201 धावांचा डोंगर उभारला. रणजीत निकमने 55, मानव टीब्रेवाला 54 आणि ऋषी यादवने 37 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला भक्कम सुरुवात दिली. प्रत्युत्तरात रावेर रॉयल्सचा डाव 20 षटकांत 7 बाद 164 धावांवर थांबला. संदेश सुरवाडेने 47 आणि तुषार चोरडियाने 46 धावांची झुंज दिली. गोलंदाजीत मोहंमद सैफने अचूक मारा करत 2 बळी घेतले आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार रणजीत निकम याला प्रदान करण्यात आला. त्याने 55 धावा करत एक बळी घेतला.

आजचे सामने (22 एप्रिल)
सकाळी ८.३० वाजता: रावेर रॉयल्स x पाचोरा एसकेटी योद्धाज.
दुपारी ३ वाजता : अमळनेर सुहांस जायंट्स xचाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.
सायंकाळी ७.३० वाजता : जळगाव कोगटा किंग x जामनेर सातपुडा हिरोज.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrajalgaon jilha criket asosiation news
Previous Post

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

Next Post

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!
1xbet russia

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon