• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ):- महावितरण कंपनीच्या टेंडरची गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याने सहाय्यक अभियंत्याला त्यांच्याच केबिनमध्ये शिरून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीपकुमार रणछोड बडगुजर (वय ५७, रा. लेक रेसिडेन्सी, मेहरूण) हे जळगाव विभागातील महावितरण कंपनीच्या दीक्षितवाडी येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी, २० एप्रिल रोजी दुपारी १२:०० ते १२:१८ वाजेच्या सुमारास बडगुजर हे आपल्या केबिनमध्ये शासकीय कामकाज करत होते. यावेळी संशयित आरोपी संजय रामभाऊ वराडे (रा. चिंचोली, ता. जळगाव) हा त्यांच्या केबिनमध्ये शिरला. त्याने बडगुजर यांच्याकडे ‘एमएसईबी’च्या टेंडर संदर्भात काही गोपनीय माहिती मागितली.

मात्र, ही माहिती देणे नियमात नसल्याने बडगुजर यांनी नकार दिला. माहिती देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या संजय वराडे याने त्यांच्याशी अरेरावी करण्यास सुरुवात केली. संजय वराडे याने रागाच्या भरात अभियंता संदीपकुमार बडगुजर यांच्या शर्टची कॉलर ओढून त्यांचा शर्ट फाडला आणि बटणे तोडली. इतक्यावरच न थांबता त्याने त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच केबिनमधील शासकीय फाईल्स अस्ताव्यस्त फेकून देऊन गोंधळ घातला. “तुम्ही माझ्या बोटातील सोन्याची अंगठी काढली, अशी खोटी तक्रार मी तुमच्याविरुद्ध देईन,” अशी धमकीही त्याने यावेळी दिली.

या घटनेनंतर संदीपकुमार बडगुजर यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी संजय वराडे याच्याविरुद्ध  शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा  दाखल केला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शासकीय कार्यालयात अधिकाऱ्याला झालेल्या या मारहाणीमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon