जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथे दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकुर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, दिलीप मोराणकर, जी.एन.गवळी, प्रदिप जयस्वाल, गोपाल बहुरे, साहेबराव कुडमेथे, शालीक गोरे, उमेश टेकाडे, ज्ञानेश्वर राठोड, मोहन पाटील, लिलाधर कोळी, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील आधी उपस्थित होते आदी उपस्थित होते.