किराणा दुकानातून ३३ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त


दुकानदाराला अटक
जळगाव (विशेष प्रतिनिधी): मानवी आरोग्यास अत्यंत घातक आणि बंदी असलेला सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने दुकानात बाळगणाऱ्या एका व्यापाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून कारवाई केली आहे. जळगाव शहरातील शिरासोली रोडवरील ‘एस. एस. डी. किराणा’ दुकानात ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पद्मजा सुनील कढरे (वय २९, रा. महाबळ रोड, जळगाव) यांना शिरासोली रोडवरील श्यामफायर कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या ‘एस. एस. डी. किराणा’ दुकानात प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने दुकानात अचानक तपासणी केली.
या छाप्यात दुकानातून ३३,९९६ रुपये किमतीचा विमल पान मसाला, V-1 तंबाखू, करमचंद पान मसाला, KC जर्दा ५०००, डायरेक्ट स्पेशल पान मसाला, राजश्री पान मसाला, XP-20 चीविंग तंबाखू आणि शॉट लक्झरी चीविंग तंबाखू असा मोठा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी पद्मजा कढरे यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:०१ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी लखन लक्ष्मणदास हिरानी (वय २८, रा. सि. नं. २७९, कंवरनगर, सिंधी कॉलनी, जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७५, २७४, २२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे स्वतः या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









