
निसर्गाची अथांग देणगी लाभलेल्या आणि केळीच्या बागांनी समृद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला राजकीय क्षेत्रातही एकापेक्षा एक खंबीर नेतृत्व लाभले आहे. या नेतृत्वाच्या मांदियाळीत एक नाव सध्या जळगावच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अग्रस्थानीप्रवा ते म्हणजे नामदार गुलाबराव पाटील.


जळगाव जिल्ह्याचे ‘पालकमंत्री’ आणि राज्याचे ‘पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री’ म्हणून कार्यरत असलेले गुलाबराव पाटील हे केवळ एक नेते नसून, सर्वसामान्य जनतेच्या सुखा-दुःखाशी जोडलेले एक हक्काचे नाव आहे.
सामान्य कुटुंबातून थेट मंत्रिपदापर्यंत: एक धगधगता प्रवास
गुलाबराव पाटील यांचा राजकीय प्रवास कोणत्याही राजकीय वारशाशिवाय, अगदी शून्यातून सुरू झाला. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुलाबरावजींनी आपल्या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ही उंची गाठली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी तरुण वयातच शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी नेहमीच ‘फिल्डवर’ राहून काम केले. धरणगाव आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रत्येक गावाशी, तिथल्या मातीशी आणि माणसांशी त्यांचे थेट नाते आहे. यामुळेच जनतेने त्यांना वारंवार निवडून देऊन विधानसभेत पाठवले.
‘वाघ’ डरकाळी फोडणार!
गुलाबराव पाटील यांच्या नावाभोवती असणारे सर्वात मोठे वलय म्हणजे त्यांची ‘तोफ’ सारखी धडाडणारी भाषणे. ग्रामीण बाज, धारदार शब्द, विरोधकांचे वाभाडे काढण्याची अचूक टायमिंग आणि सर्वसामान्यांच्या भाषेत संवाद साधण्याची त्यांची कला अद्भूत आहे. “गुलाबराव पाटील स्टेजवर आले की शांत बसलेला जनसमुदायही ऊर्जेने भरून जातो.”
त्यांच्या भाषणातील सहजता, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची हातोटी यामुळे त्यांना ऐकण्यासाठी आजही हजारोंची गर्दी उसळते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती दिली आहे.








