जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित विविध संस्थामध्ये आज लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालय
येथे माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय एकता दिन व जयंती निमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी विभाग प्रमुख अनंत इंगळे,भुषण चौधरी,पंकज राणे, मिलींद पाटील, नरेंद्र नारखेडे, यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. उल्हास पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना ’लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. त्यांनी भारत देशाच्या एकीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे भारताच्या आजच्या नकाशाची निर्मिती झाली. ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. त्यांनी संस्थानांचे एकत्रीकरण करून एक मजबूत भारत तयार केला.आजचा भारत त्यांच्या दूरदृष्टी आणि अदम्य राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. असे सांगितले.
डॉ.उल्हास पाटील विधी,विज्ञान महाविद्यालय
जळगाव — डॉ.उल्हास पाटील विधी विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नयना झोपे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदिप महाजन, प्रा अमोल चौधरी यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यांनी सरदार पटेल यांच्या महान कार्याची आणि भारताच्या एकीकरणातील त्यांच्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी कॉलेजचे टीचिंग व नॉन-टीचिंग स्टाफ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेज प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. याचबरोबर गोदावरी अभियांत्रिकी,गोदावरी आयएमआर, डॉ.वर्षा पाटील इन्स्टी ऑफ टेक्नॉलॉजी,गोदावरी इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल, डॉ.उल्हास पाटील ग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल, सावदा, डॉ.उल्हास पाटील ग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल,भुसावळ,डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर,कृषि अभियांत्रिकी,अन्न व तंत्रज्ञान येथे देखिल अभिवादन करण्यात आले.









