जळगाव : प्रतिनिधीगोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन म्हणून उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.

यावेळी प्राचार्य विशाखा गणविर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून देत. देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय ऐक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान विषद केले.
राष्ट्रीय भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला सदैव प्रेरणा देणारे असून, त्यांच्या आदर्शांनुसार एकसंघ, सक्षम आणि मजबूत भारत घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.









