जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल,जळगाव येथे सायन्स क्लब अंतर्गत मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, ज्या विद्यार्थ्यांना मुळातच विज्ञानाची आवड आहे त्यांचा ज्ञानात आणखी भरत पडावी, या उद्देशाने शाळेतील सायन्स क्लबतर्फे प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली असून यात विज्ञान विषयासंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील आपली बुद्धिमत्ता पणाला लावून विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देवून शिक्षकांकडून शाबासकी प्राप्त केली. गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. गोदावरी सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.