जळगाव (प्रतिनिधी) – औद्योगीक वसाहतीला लागून जळगाव-भुसावळ मार्गावरील पंढरपुर नगरातील बेचाळीस वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पेालिसांत या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली असून प्रभाकर घनश्याम पवार (वय-४२) असे मयताचे नाव आहे.
पंढरपुर नगरातील रहिवासी प्रभाकर घनशाम भंगाळे (वय-४२) यांनी आज सकाळी दहा वाजेच्या पुर्वी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्त्या केली. कुटूंबीय व शेजार्यांना कळताच त्यांनी मृतदेह खाली उतरवुन जिल्हारुग्णालयात आणले.
जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत मुख्य वैद्यकीय अधीकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी तपासणी केल्यानंतर प्रभाकर भंगाळे यांचा मृत्यु झाल्याचे सांगीतले. एमआडीसी पेालिसांत डॉ. भंगळे यांच्या खबर वरुन अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक चेतन सोनवणे, किशोर बडगुजर करत आहेत.