शिरसोली महाजन हाँटेल जवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव-पाचोरा रोडवरील शिरसोली गावा जवळ महाजन हाँटेल समोर पाचोरा कडून सुसाट वेगात येणा-या आयशर ट्रकने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना घडली. अपघातात बांधकाम सेटिंग कारागीर लालसिंग वलसींग चव्हाण (वय-३५,रा.देविदास कॉलनी जळगाव) यांचा जागीच मृत्यु झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी ठरला
जळगाव शहरातील देविदास कॉलनी येथील रहिवासी लालसिंग वलसिंग चव्हाण (वय-३५) हे बांधकामावर सेंट्रीक कामे करुन कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होते. मुळ सोयगाव तालूक्यातील जंगली तांडा ( जि. औरंगाबाद) येथील रहिवासी लालसिंग चव्हाण कामधंद्या मुळे जळगाव येथे स्थायिक झाले होते.
आज दि. 13 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास चव्हाण हे पाचोरा कडे मोटारसायकल (एमएच.१९.डीसी.५१०२) या वाहनाने जात असतांना पाचोरा कडून सुसाट वेगात येणा-या (एमएच.१२आर.एन.७५९९) या आयशर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. शिरसोली गावा पासून तीन किलेामिटरवर अंतरावर असलेल्या महाजन ढाबा(हॉटेल) समोर हा अपघात घडला. अपघाता नंतर ट्रक न थांबवता तशाच पळून जात असल्याने शिरसोली ग्रामस्थांनी दुचाकीने ट्रकचालकाचा पाठलाग केल्यावर चालकाने शेताशेजारी ट्रक उभा करुन क्लिनरसाईडने उडी घेत पळ काढला. घटनेची माहिती कळताच औद्योगीक वसाहत पेालिस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे, रमेश अहिरे, इम्रान सैय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी वाहनाने मयताला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येवुन अपघातग्रस्त वाहने पेालिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे करीत आहे.
सदर ही आयशर ही पुणे येथील अनिकेत ट्रान्सपोर्टची असल्याचे कळते