जळगाव ;- अंजुमन तालिमुल मुस्लेमिन संचलित एम. ए. आर. ॲग्लो उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज जळगावमध्ये डॉ. गफ्फार मलिक यांना ग्लोबल हयुमन पीस विद्यापीठ तमिळनाळूतर्फे पीएच.डी पदवी प्रदान झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. बाबू शेख यांनी केले. अध्यक्षीय भाषणात शेख अमीन शेख अमीर यांनी डॉ. मलिक यांच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सै.चाँद सै.अमीर, संस्थेचे सभासद शेख शफीक, शेख सलिम, प्रा. एम. इकबाल, डॉ. मोइनुददीन उस्मानी, माजी प्राचार्य फारुख अंसारी, शेख सगीर गनी, प्रा. जफर, महाराणा प्रताप विद्यालयाच्या प्राचार्या साधना शर्मा, जाकीर हुसैन विदयालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यांनी हाजी डॉ. गफ्फार मलिक यांचा सत्कार केला. शफीक सिद्दीकी यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य एस. एम. फारुख यांनी आभार मानले. या वेळी ॲग्लो उर्दू हायस्कूलमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते.