जळगाव ;- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठेचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी यांना बुधवारी पुणे येथे सावित्राबाई फुले विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त उच्च शिक्षणात आणि प्रशासनातील कामकाजासाठी ‘जीवन साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक यासह इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रशांत हिरे, निवेदक सुधीर गाडगीळ, तर सामाजिक कार्यासाठी प्रा. साधना झाडबुके (कोल्हापूर) यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले. पद्मश्री ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात अाला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलगुरू डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.