• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतातील विहिरी व बोअरवेलमधील केबल चोरीचे गुन्हे उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतातील विहिरी व बोअरवेलमधील केबल चोरीचे गुन्हे उघड

४ चोरट्यांसह चोरीचा माल खरेदी करणारा भंगार दुकानदार अटकेत; ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी आणि बोअरवेलमधील विद्युत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चोरी करणाऱ्या चार जणांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या एका भंगार दुकानदाराला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी एकूण ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युत केबल चोरी होण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. फत्तेपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोणी, ता. जामनेर येथील शेतकरी गोपाल प्रल्हाद कोल्हे यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलमधील केबल चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३१७(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी संशयितांचा माग काढला. त्यानंतर नारायण काळू कोळी (वय २८), शाहरुख अजित तडवी (वय २७), प्रवीण धनराज गावळी ऊर्फ कोळी (वय २५) आणि विकास गजानन जाधव (वय १९), सर्व रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव, यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदाराचाही पोलिसांनी शोध घेतला. त्यानुसार राजीक खान लाड खान (वय ३०, रा. अजिंठा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.

७० हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी दोन लोखंडी कटर, तांब्याच्या तारा, विद्युत केबलमधील तांब्याच्या तारा आणि हिरो कंपनीची मोटारसायकल असा एकूण ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेतातील विद्युत केबल, मोटारपंप तसेच इतर कृषी साहित्य चोरीच्या घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

Tags: fattepur crime news
Previous Post

‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतातील विहिरी व बोअरवेलमधील केबल चोरीचे गुन्हे उघड
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतातील विहिरी व बोअरवेलमधील केबल चोरीचे गुन्हे उघड

October 9, 2026
‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
खान्देश

‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
उसनवारीच्या पैशांच्या वादातून २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची हत्या ; भुसावळमध्ये खळबळ
क्राईम

उसनवारीच्या पैशांच्या वादातून २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची हत्या ; भुसावळमध्ये खळबळ

October 9, 2026
नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया
जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतातील विहिरी व बोअरवेलमधील केबल चोरीचे गुन्हे उघड

फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतातील विहिरी व बोअरवेलमधील केबल चोरीचे गुन्हे उघड

October 9, 2026
‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!