संशयीतांकडून आठ दुचाकी जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मार्केट परिसरातून दुचाकी चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीला शहर पोलीस ठाण्यातील पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक’ अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदिप गावित यांनी दुचाकीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना केल्या होत्या. सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास संशयित चोरटे गोलाणी मार्केट परीसरात येताच सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोना/किशोर निकुंभ यांनी त्यांना ताब्यात घेतले. विचारपुस करता त्यांनी त्याचे नाव शुभम भगवान चौधरी (वय-२५, रा. रिंगणगाव ता. एरंडोल जि. जळगांव) मोईन मुक्तार मणियार (वय-१८, रा.टॉवर चौक रिंगणगांव ता. एरंडोल जि. जळगांव), ओम सुरेश हटकर (वय-१८, रा.टॉवर चौक रिंगणगांव ता. एरंडोल) असे सांगितले.
त्यांची विचारपूस केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. दुचाकी चोरी करण्यासाठी दोन अल्पवयीन बालकांचे देखील संशयित आरोपी म्हणून नाव निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांचेकडुन ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एकुण ६ गुन्हे उघड झाले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोना किशोर निकुंभ हे करीत आहेत.