जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील लोटस हॉस्पिटल समोरून ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवार ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत बुधवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात डॉ. रवी वासुदेव कुकरेजा (वय-३७ ) हे आपल्या परिवारासह राहायला आहे. जळगाव शहरातील लोटस हॉस्पिटल येथे त्यांचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या आत (एमएच १९ डीसी ८८२४) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावलेली होती. ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर डॉ. रवी कुकरेजा यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु कुठेही मिळाली नाही. अखेर त्यांनी बुधवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास सातदिवे हे करीत आहे.