जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चिंचोली शिवारातील वसीम पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून अल्युमिनियमचे धातूचे तार, लोखंडी चैनल व इतर साहित्य असा १ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. चौकशीअंती अखेर बुधवार ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात शिवारातील वसीम पेट्रोल पंपाच्या बाजूला बांधकामाचे काम सुरू आहे. हे काम गव्हरमेंट कॉन्स्ट्रॉक्टर संजय रामभाऊ वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. दरम्यान बांधकामाच्या ठिकाणाहून अज्ञात व्यक्तीने अल्युमिनियम तार, लोखंडी चैनल व इतर साहित्य असा एकूण १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संजय वराडे यांनी सर्वत्र चौकशी केली, परंतु त्यांना चोरीबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर चौकशी आणि बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहे.