जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे आयोजित ‘फिजिओ गणेशा २०२६’ या उत्सवाची सांगता २० सप्टेंबर रोजी मेहरूण तलाव, जळगाव येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाच्या विसर्जनाने झाली.

महाविद्यालयात बाप्पाची मनोभावे पूजा व आरती करून विद्यार्थ्यांनी जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात, नृत्य आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.
आनंद आणि उत्साहाने भरलेल्या या क्षणांना निरोपाची वेळ येताच भावूक वळण मिळाले. लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने, भरलेल्या डोळ्यांनी आणि असंख्य आठवणींसह सर्वांनी निरोप दिला.
हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेने, प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आणि प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पाडला.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात फिजिओ गणेशा २०२६ ची भावपूर्ण सांगता झाली.








