पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील छत्रपती शिवाजी नगरात नगर परिषदेने बांधलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाला.
आ. किशोर अप्पा पाटील यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर मंगल कार्यालयाच्या कोनशीला अनावरणाचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा नगरसेवक हाजी बशीर बागवान यांना दिला. त्यांचे हस्ते कोनशीला अनावरण झाले या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचेसह नगरसेवक, परिसरातील नागरिक , पालिका कर्मचारी व पत्रकारांची उपस्थिती होती.