धरणगाव (प्रतिनिधी);- गैरवर्तन करणार्या भाजपच्या १२ आमदारांच्या निषेधार्थ धरणगाव शिवसेना तर्फे आज सकाळी जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ‘जोडे मार’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी करून प्रस्ताविक शरद माळी यांनी केले.
त्यानंतर जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख मा.श्री. गुलाबराव जी वाघ साहेब यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सर्वप्रथम निषेध व्यक्त करून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की ” एकावेळी फक्त 6 पैसे पेट्रोल महाग झाल्या मुळे अटल बिहारी वाजपेयी संसदेत बैलगाडी घेऊन गेले होते.आता तर पेट्रोल 100 च्या वर असताना सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल उपस्थित करुन . वारे मोदी तेरा खेल सस्ती दारु मेहेंगा तेल असे म्हणत वाघ साहेबांनी केन्द्र सरकार वर निशाना साधुन . भाजपा नेतृत्वाचा जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना उपशहरप्रमुख भरत महाजन, तालुका उपप्रमुख प्रमुख राजेंद्र ठाकरे, मोतीलाल पाटील , विभाग प्रमुख संजय चौधरी,उप जिल्हा संघटक अॅड. शरद माळी तसेच शिवसेनेचे गटनेते विनय भावे, उपनगराध्यक्ष विलास महाजन, नगरसेवक सुरेश महाजन, भागवत चौधरी, नंदू पाटील, किरण मराठे, अहमद पठाण, जितेंद्र धनगर ,अजय चव्हाण,शरद करमाळकर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी वाल्मीक पाटील, बाळू जाधव, राहुल रोकडे, गुड्डू पटेल, वसीम पिंजारी, सतीश बोरसे, कमलेश बोरसे, रवींद्र जाधव ,परमेश्वर रोकडे, किरण अग्निहोत्री,पप्पू कंखरे, करण वाघरे ,पापा वाघरे, भैय्या महाजन ,विनोद रोकडे, गोपाल चौधरी, अरविंद चौधरी व सचिन चव्हाण आदींच्या परिश्रमाने आजचे आंदोलन यशस्वी करण्यात आले.