• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महायुतीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली : खा. प्रतापगढी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महायुतीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली : खा. प्रतापगढी

रावेरला महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरींना पाठिंबा देण्याचे आवाहन

माजी महापौर करीम सालार यांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश

यावल (प्रतिनिधी) :- महायुतीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या विरुद्ध वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरुद्ध अपक्ष व इतर उमेदवार उभे करण्याचा डाव महायुतीच्या राजकारण्यांनी खेळलेला आहे अशी टीका खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केली. मात्र जनतेने याला बळी न पडता महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ फैजपूर येथे झालेल्या सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार धनंजय चौधरी, चोपड्याचे उमेदवार प्रभाकर सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, हरियाणाचे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दीपक लांबा, जम्मू काश्मीरच्या साइमा जान, इनायत उल्लाखान, कॉँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, हारून नदवी, माजी आमदार रमेश चौधरी, करीम सालार, मुकुंद सपकाळे, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कॉँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, कॉँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, फैजपूरचे कुर्बान शेख, शब्बीर शेख, प्रल्हाद बोंडे, रमेश महाजन रोझोदा, योगिता वानखेडे, मानसी पवार, योगेश पाटील, राजू तडवी, सुनील कोंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जळगावचे माजी महापौर करीम सालार यांनी खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत कॉँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारासाठी फैजपूर येथील फार्मसी कॉलेजजवळ प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी जम्मू काश्मीर येथून आलेल्या साइमा जान, इनायत उल्लाखान, हारून नदवी, करीम सालार, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, ज्ञानेश्वर बढे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी खासदार इम्रान प्रतापगढी यांनी भाजप सरकारवर टीका केली. सत्तेसाठी अपक्षांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मते फोडण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मतदारांनी जातपात, समाज न पाहता महाविकास आघाडीच्या पाठीशी मतांच्या माध्यमातून ताकद उभी करावी असे आवाहन खासदार प्रतापगढी यांनी यावेळी उपस्थितांना केले.

रावेर-यावल मतदार संघातील मतदार मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. सूत्रसंचालन नेहा चौधरी यांनी केले. गत काळात आमदार शिरीष चौधरी यांचे काम व समाज विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे धनंजय चौधरी यांचे हात बळकट करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रावेर यावल शाखेने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांना पाठिंबा दिला आहे. तसेच राष्ट्रीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या आदेशावरून उमेदवार धनंजय चौधरी यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र देण्यात आले आहे.


 

 

Tags: #raver #dhanajay choudhari news
Previous Post

लाख करो तुम बदनाम, मेरा नाम ना मिटा पाओगे, क्यूकी मेरे चाहनेवाले मेरा नाम कागज पे नही, दिल पे लिखते है..!

Next Post

दाखल गुन्ह्यात त्रास होऊ नये म्हणून तक्रारदाराकडून २ हजारांची लाच घेताना हवालदारासह पंटर रंगेहात अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दाखल गुन्ह्यात त्रास होऊ नये म्हणून तक्रारदाराकडून २ हजारांची  लाच घेताना हवालदारासह पंटर रंगेहात अटकेत

दाखल गुन्ह्यात त्रास होऊ नये म्हणून तक्रारदाराकडून २ हजारांची लाच घेताना हवालदारासह पंटर रंगेहात अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
जैन कंपनी

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon