नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. कारण देशात करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 30 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात चिंता व्यक्त केली जात असतानाच यंदाचा ‘आइफा पुरस्कार’ (International Indian Film Academy Awards) सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.आयफा 2020 चं आयोजन यंदा इंदौरमध्ये 27-29 मार्च या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं. मात्र, उत्तर भारतात करोनाचे रुग्ण आढळल्याने आता हा सोहळाज काही दिवसांसाठी पुढे ढकला आहे.