नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कर्नाटकमध्ये दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 12 जण ठार झाले आहेत. यात 1 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. बंगळुरु- मंगळुरु महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांमध्ये दोन लहान मुलांच्या समावेश आहे. समोरून येणाऱ्या एसयुव्हीमधील सारे प्रवासीही जागीच ठार झाले आहे. या अपघातात 4 जण गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.