• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार जळगावात सादरीकरण करणार; छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात चार दिवस रंगणार अभिजात संगीताची मैफल

जळगाव (प्रतिनिधी) : खानदेशच्या सांस्कृतिक वैभवात मानाचे स्थान मिळवलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित हा २५ वा महोत्सव ७ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात पार पडणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत संगीतप्रेमींना अभिजात संगीताची मेजवानी मिळणार आहे.

भारतीय अभिजात संगीताचा खानदेशातील सांस्कृतिक मानदंड म्हणून ओळख निर्माण केलेल्या या महोत्सवात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहकार्य लाभले आहे.

पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन आणि कथक

७ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभानंतर महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पहिल्या सत्रात पुण्यात वास्तव्यास असलेल्या प्रतिभावान गायिका पंडिता मंजुषा पाटील-कुलकर्णी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना संवादिनीवर लिलाधर चक्रदेव आणि तबल्यावर आशय कुलकर्णी साथसंगत करतील.

दुसऱ्या सत्रात पंडिता शमाताई भाटे यांच्या शिष्यांचा ‘त्रिमिती’ हा कथक नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी आणि नयन कोहले हे कलाकार कथक नृत्याची प्रस्तुती करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी गझल, सुगम गायन आणि कथक

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘सारेगमप’ हिंदी रिअॅलिटी शोमधील सहजेदीप सिंग यांचे गझल व सुगम गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर अमनदीप सिंग, तर दिलरुब्यावर अंगदीप सिंग साथ देतील.

दुसऱ्या सत्रात बनारस येथील प्रख्यात कथक नर्तक पं. रुद्र शंकर मिश्रा यांचे कथक नृत्य सादर होणार आहे. त्यांना पखवाजावर त्यांचे गुरू व पिताश्री पं. माताप्रसाद मिश्रा, तबल्यावर उदयशंकर मिश्रा आणि सारंगीवर ओम सहाई मिश्रा साथसंगत करतील.

तिसऱ्या दिवशी शास्त्रीय गायनाची मेजवानी

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयात उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या पंडिता भारती राजपूत यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर पं. कुमार गंधर्व यांच्या परंपरेतील अमोल कुमार यांच्या बंदिशी आणि निर्गुण भजने सादर केली जाणार आहेत.

महोत्सवाच्या आयोजनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच सुहान्स केमिकल्स प्रा. लि. आणि होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांचेही सहकार्य असणार आहे.

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी आयोजनामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संगीतप्रेमींना चार दिवस दर्जेदार अभिजात संगीताचा आनंद घेता येणार आहे.

Tags: https://kesariraj.com/jalgavat-balgandharv-sangit/
Previous Post

घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेच केली घरफोडी; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!

Next Post

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!
खान्देश

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

November 27, 2026
जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!
जैन कंपनी

जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!

November 27, 2026
घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेच केली घरफोडी; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!
क्राईम

घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेच केली घरफोडी; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!

November 27, 2026
रात्रीच्या नाकाबंदीत ४.७२ लाखांचा दंड वसूल
क्राईम

रात्रीच्या नाकाबंदीत ४.७२ लाखांचा दंड वसूल

November 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

November 27, 2026
जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!

जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!

November 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!