गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरूच
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे दोन गुन्हेगारांना जळगांव जिल्हयातून हद्दपार करण्यात येत आहे.त्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पारित केले आहे. यापूर्वीही काहि गुन्हेगारांवर हद्दपारी व एमपीडीएच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी डीवायएसपी संदीप गावित यांनी केलेली आहे.
दोन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून जळगाव शहरात जिल्हयांत ठिकठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालीला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांत शांतता सुव्यवस्था ठेवण्याबाबत त्यांचे विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल असून त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे.
सदरचा हदपार प्रस्ताव हा जळगांव शहर पो.स्टे.चे पो.निरी. अनिल भवारी, याशीर तडवी, पोहेकॉ विनय निकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोकॉ अमोल ठाकुर, पोना प्रफुल धांडे यांनी तयार करून पोलीस अधीक्षक यांचेकडेस सादर केला होता. पोलीस अधीक्षकांनी दोघांना हद्दपार केले आहे. कामकाज एलसीबीचे पो निरी. किसन नजनपाटील यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी पाहिले.