जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तीन संशयित आरोपींवर विनयभंग व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत पोलीस पुढील तपास करीत आहे.
नशिराबाद येथे राहणाऱ्या एका १५ वर्षीय तरुणीने रविवारी दि. २ जून रोजी फिर्याद दिली आहे. यात संशयित आरोपींची वेळोवेळी पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. त्यामुळे संशयित मारुफ शेख मणियार, मारुफ शेख रऊफ, रिजवान शेख मणियार (सर्व रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. नशिराबाद पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश घायतड हे तपास करीत आहेत.